आभार
आभार: कृतज्ञतेचे दोन शब्द...एक 'पवित्र' सुरुवात! अ अभिनव नलू, आपला हा ब्लॉग म्हणजे केवळ एक माहितीपत्रक नसून तो एक कादंबरीसदृश साहित्याचा प्रकार आहे. प्रस्तावना आणि समर्पण यानंतरचा पुढचा अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो तो म्हणजे आभार प्रदर्शनाचा. आपल्या या खऱ्याखुऱ्या कथेला सुरुवात करण्यापूर्वी मला काही जणांचे अगदी मनापासून आभार मानायचे आहेत. आणि यात सर्वप्रथम नाव येते ते Z5 वरील डेली सोप मालिका 'पवित्र रिश्ता' , त्यांच्या संपूर्ण टीमचे, विशेषतः 'एकता कपूर' आणि त्यांच्या प्रॉडक्शन हाऊसचे. तसं पाहिलं तर मी डेली सोपचा खूप मोठा पुरस्कर्ता कधीच नव्हतो. पण आजकालच्या या धकाधकीच्या आणि यंत्रवत जीवनात, कुटुंबातील सगळी माणसं आपापल्या वेगवेगळ्या विश्वात इतकी व्यग्र झाली आहेत की, इच्छा असूनही सर्वांना जोडणारा कोणताही सामाईक दुवा उरत नाही. आपण लाख म्हणतो की आपण एकमेकांशी संवाद साधू, आयुष्यातील अनुभव शेअर करू, पण प्रत्यक्षात ते...